डोंबिवली : तबलावादक झाकीर हुसेन यांचे गुरू आणि वडील उस्ताद आल्लरखा यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून श्यामल म्युझीक फाऊंडेशन आणि वरूण तबला विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने ब्राह्मण सभागृहात `पेशकार` या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजस आणि तेजस उपाध्ये यांची व्हायोलीन जुगलबंदी प्रेक्षकांसमोर सादर केली. राग चारूकेशी सादर करताना आलाप जोड आणि झाला अशापध्दतीने ही जुगलबंदी रंगली होती. तर उस्ताद अल्लारखा आणि झाकीर हुसैन चे शिष्य भुषण परचुरे यांनी रुपक ताल वाजवून तेजस आणि राजसच्या व्हायोलीन वादनाला तबल्याची साथ दिली. विशेष म्हणजे यावेळी सादर केलेले वैष्णवजन या भजनामुळे सभागृहातील वातावरण भक्तीभावाने प्रसन्न झाले होते. या कार्यक्रमाच्या मध्यंतरानंतर पंडीत रुपक कुलकर्णी यांनी बसरीवर साडे आठ मात्रांचा राग जोग आणि हंसध्वनी वाजवून रसिकांची दाद मिळवली. यावेळी आदित्य कल्याणपूर यांनी तीन तालवर तबल्याची साथ दिली. नवीन कलाकरांनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचा मुख्य हेतु असल्याचे वरूण दामले यांनी सांगितले. तर उस्ताद अल्लारखा यांच्याकडे तबला शिकायला मिळणे हे आमचे अत्यंत थोर भाग्य असल्याची भावना भूषण परचुरे आणि आदित्य कल्याणपूर यांनी व्यक्त करून तबल्याच्या तालातूनच गुरूंना वंदन केले.
पेशकार कार्यक्रमात माध्यमातून उस्ताद आल्लरखा यांना वंदन..
March 31, 2019
33 Views
1 Min Read

-
Share This!