महाराष्ट्र

ब्रेकिंग – परभणी , शिवसेना नगरसेवकाची हत्या

परभणी :  किरकोळ कारणावरून शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना परभणीमध्ये आज सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परभणीतील जायकवाडी वसाहतीसह संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
अमरदीप रोडे असे हत्या झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे तर रवि गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले असुन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. झालेल्या किरकोळ वादातुन अमरदीप यांचेच सहकारी गायकवाड आणि ढाके यांनी त्यांच्यावर हल्‍ला केला. हल्‍ला करून दोघेही पोलिस ठाण्यात पोहचले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिसांनी रवि गायकवाड आणि किरण ढाके यांना अटक केली. नेमक्या कोणत्या कारणामुळे गायकवाड आणि ढाके यांनी अमरदीप रोडे यांच्यावर हल्‍ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!