जोधपूर: राजस्थानच्या जोधपूर येथे आज हवाई दलाचं मिग-२७ हे लढाऊ विमान कोसळलं असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं हवाई दलानं स्पष्ट केलं. हे लढाऊ विमान रुटीन मिशनवर असताना हा अपघात झाला.
सिरोहीच्या गोंडानामधील शिवगंज येथे आज सकाळी ११.४५च्या सुमारास ही दुर्घटना झाली. उटारलाई हवाई दलाच्या बेसवरून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. मात्र काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्यानं जोधपूरपासून १२० किलोमीटर अंतरावर विमान कोसळलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं कळताच विमानातील दोन्ही पायलटनी विमानातून उड्या मारल्या, त्यामुळे ते बचावले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येतं.