डोंबिवली : प्रत्यारोपण शल्यचिकित्सेत दोन दशके योगदान यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून अवघ्या ९९हजारात गुडग्याचे प्रत्यारोपण करण्याची संधी सुप्रसिद्ध अस्थीशल्यचिकत्सक डॉ.विजय शेट्टी यांनी सिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.`९९ थाउजंड फॉर ऑल` या योजनेअंतर्गत या योजनेचा संकल्प डॉ. शेट्टी यांनी जाहीर केला. डोंबिवली येथील ठाकूर हाँलमध्ये सिटी हॉस्पीटलच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन आर्थोपेडीक असोशिएशनचे माजी अध्यक्ष राम प्रभू, असोशिएशनचे सदस्य डॉ. सुरेश शेट्टी, संजीवनी हाँस्पीटलचे डॉ. अरुण पाटील, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. डॉ.शेट्टी यांनी योजनेची माहिती देताना सांगितले की, योजनेमुळे गुडग्याच्या दुखण्याला त्रासलेल्यांना गरजु रुग्णांना वरदान मिळणार आहे. या प्रत्यारोपणामुळे दर्जेदार जीवन प्राप्त होउ शकते.गुडघे प्रत्यारोपण संबधी नेहमीच पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात संशयाचे धुके असते.तुलनेने नवीन असलेल्या उपचार पध्दतीने रास्त दरात प्रत्यारोपण शल्यचिकित्सा होउ शकते.बहुतेकदा गुडघे प्रत्यारोपणाची गरज अस्थी सुषरिता झालेल्या रुग्णांवर करण्यात येते.त्याचबरोबर गुडग्याचे विकार, अपघात यात गुडघ्यांचा स्नायूबंध किंवा गुडघ्याची हानी झाल्यामुळे पायांच्या हालचालींवर मर्यादा येतात हा सांधा कुत्रिम साधनाने बदलण्यात येतो.या शस्त्रक्रियेत एकमेकांना घासणा-या हाडांवर विशिष्ट धातुचे इम्प्लाट बसविण्यात येतात.शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर रुग्ण दर्जेदार जीवनाचा आनंद घेऊ शकतात.आमच्याकडे शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्णांना झटपट आराम मिळतो.जलद बरे वाटते.शल्यचिकित्सेत कमी रक्तप्रवाह होतो. हा आनंद सामन्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी ९९ थाउजंड फाँर आँल या वैद्यकीय योजनेचा संकल्प जाहीर करत असल्याचे डॉ.विजय शेट्टी यांनी सांगितले.
राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षणामध्ये राज्य सरकारने नीट परीक्षा सुरु केल्याने गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाचा लाभ मिळू लागला आहे. टेली मेडिसिन मुळे खेडेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात निदान आणि उपचार याचा फायदा डॉक्टर आणि रुग्णांना होत असल्याची माहिती दिली.डॉ. विजय शेट्टी यांना संकल्पाबद्दल शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे अस्खलित इंग्रजी भाषेतील नीटनेटके सुत्रसंचालन अर्चना राँड्रीग्ज शिंदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रज्ञा शेट्टी यांनी मानले.