बीड : सातव्या वेतन आयोगाच्या फाईलवर सही करुन ती पुढे पाठवण्यासाठी १२०० रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज वाहली प्राथमिक शाळेच्या परिसरात करण्यात आली.
एकनाथ गोरखनाथ लाड (वय-५१) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी शिक्षक तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.