ठाणे

ठाणे ग्रामीण पोलीसांची  896 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  ठाणे ग्रामीण पोलीसांनी896 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली,अशी माहिती  पोलीस अधिक्षक कार्यालय ठाणे ग्रामीणच्या जिल्हा विशेष शाखेने दिली आहे.

यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की, पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या सुचनेनुसार, अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस स्टेशनस्तरावर आचारसंहिता काटेकोर अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न होत आहेत.  त्यासाठी विविध पथके स्थापन करुन  896 इसमांवर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता अधिनियमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अवैध दारु धंद्यांवर छापे मारुन एकूण 109 गुन्हे दाखल केले असुन एकूण 6 लाख 88 हजार 457 रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला आहे. तसेच 06 इसमांवर हद्दपार करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई करुनत्यांच्याकडून 25 किलो वजनाची तीन कोटी रुपये किमतीची इफिड्रिन नावाची पावडर जप्त केली आहे. तसेच बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करुन त्यांच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत शस्त्र परवाना धारकाचे एकूण 427 शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक शांतपणे पार पाडण्यासाठी धडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!