गुन्हे वृत्त

⭕ ब्रेकिंग – जुन्नर तालुक्यात पिंपळवंडी गावाजवळ मोठा शस्त्रसाठा सापडला

पुणे :   पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात पाइप बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह तलवारी, भाले, कोयता, चिलखत यासारखे शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच दहशतवाद विरोधी पथकाने हा शस्त्रसाठा ताब्यात घेतला असून एका स्थानिक व्यक्तीकडे कसून चौकशी सुरू आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात शस्त्रसाठा सापडल्याने तपास यंत्रणांची धावपळ उडाली आहे. पिंपळवंडी येथील अभंग वस्ती येथे राजाराम किसन अभंग (६०) याच्या शेतातील पडक्या घरात हा शस्त्रसाठा सापडला आहे.

अभंग याच्या घरात इलेक्ट्रिक गन तसेच पाइप बॉम्ब बनविले असून तलवार, कोयता, दोन भाले आणि स्फोटक बनविण्यासाठीचे साहित्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार अभंग यांच्या घरावर छापा घालत हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यामध्ये पाइप बॉम्ब बनविण्यासाठी तयार केलेले स्ट्रक्चर, इलेक्ट्रिक गन, गन पावडर तसेच एका तेलकट कागदामध्ये स्फोटकांची पावडर आढळली आहे. त्याशिवाय दोन तलवारी, दोन भाले, ५९ डिटोनेटर, इलेक्ट्रिक स्विच, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक बॅटरी, हाताने तयार केलेले चिलखत तसेच एक हेल्मेट असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!