ठाणे

दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाश्यांचा रेल रोको

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्थानकात जलद लोकल कर्जत, कसार्‍याववरून येत असल्यामुळे दिवा स्थानकात महिला प्रवाशांना डब्यात चढता येत नाही. असाच प्रकार गुरुवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार येथे घडला.

दिवा स्थानकात सकाळी 6.56 मिनिटांनी मुंबई सीएसएमटिला जाणारी जलद लोकल आली असता, या लोकल मधील महिलांच्या डब्यात दरवाजात उभ्या असलेल्या महिलांनी दिव्यातील महिला प्रवाशांना डब्यात प्रवेश करून दिला नाही. यामुळे दिव्यातील महिलांना याचा संताप आल्याने दरवाजात उभे असलेल्या महिलाना दिव्यातील महिलांनी खाली खेचले आणि लोकलच्या मोटरमनला सांगून रेल्वे रुळावर महिला उतरल्या. या गोंधळामध्ये रेल्वे समोर महिलांनी उभ्या राहून रेल्वे प्रशासनाचा निषेध करत, लोकल पंधरा मिनिटे रोखून धरली. यामुळे गुरुवारी सकाळीच मध्य रेल्वेची अप मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली.

रेल रोको झाल्याचा दिवा स्थानकातील पोलिसांना समजताच पोलिसांनी महिलांना दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला पोलिस कर्मचारी कमी प्रमाणात असल्यामुळे रेल रोको झाला. यानंतर महिलांनी फलाटावर येऊन आपला पुढील प्रवास गर्दीतून केला. यामुळे या रेल रोकोचा फटका सकाळीच मुंबईला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना बसला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!