डोंबिवली : स्टेशनबाहेर १०० मीटरच्या आत फेरीवाल्यांना बसण्यास, महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बाहेरील १०० मीटरच्या आत मनाई आदेश आहेत. मात्र फेरीवाल्यांच्या गाड्या बंद असतानाही त्याच्यावर कारवाई करून गाड्या तोडून टाकण्यात आल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे. या अनायाकारक कारवाईला फेरीवाल्यांनी कडाडून विरोध करत पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. तसेच आचारसं सुरु असल्याने आंदोलन करण्यास परवानगी मिळणार नाही असे फेरीवाल्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले.
डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या एक दिवस अगोदर पालिकेचे फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्याने फेरीवाल्यांना गाड्या बंद ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार फेरीवाल्यांनी आपल्या गाड्या बंद केल्या होत्या. मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांच्या बंद गाड्याची तोडफोड केली. बंद गाड्यावर कारवाई करणे चुकीचे असल्याचे सांगत पालिका प्रशासनाचा यामागे कोणता उद्देश आहे असा प्रश्न फेरीवाल्यांनी उपस्थित केला. पालिकेच्या `इ` प्रभागाकडून कारवाई झाल्याचे समजताच शिवगर्जना हॉकर्स युनियनचे अध्यक्ष भाऊ पाटील यांनी फेरीवाल्यांना घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात गेले. मात्र आपली तक्रार पोलीस ठाण्यात घेतली जाऊ शकत नसून पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे तक्रार करा अशी उत्तरे फेरीवाल्यांना देण्यात आली.पालिकेच्या अन्यायकारक कारवाईविरोधात आंदोलन छेडता येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.याबाबत भाऊ पाटील म्हणाले, फेरीवाले हे देशाचे नागरिक आहेत.त्याच्यावर अशी कारवाई कशी होऊ शकते.फेरीवाल्यांना न्याय मागण्याचा पण हक्क नाही का ? आचारसंहिता संपल्यावर याबाबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल
पालिका कचरा निर्मुलन आकार घेता मग आम्हालाच उचलावा लागतो कचरा…
विना परवाना महापालिकेच्या जागेवर असलेल्या हातगाड्या वस्तू / माल असल्याबद्दल दैनिक भोगवाटा नि कचरा निर्मुलन आकार रुपये ३७ असे पालिका प्रशासन फेरीवाल्यांकडून आकारते. मात्र पालिका प्रशासनाने या पथावरील कचरा उचलले गरजेचे असताना कचरा निर्मुलन आकारहि घेऊन कचरा उचलला जात नाही.मग पालिका प्रशासन आपल्या कामापासून का हात वर करते असा प्रश्न फेरीवाल्यांनी उपस्थित केला आहे.