कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांनी सोमवारी डोंबिवलीतील क्रीडा संकुलात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज भरले.यावेळी आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, संजीव नाईक आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे आणि नवीन सिंग, सचिन पोटे,ज्योती कलानी आले होते. तसेच बसपा-सपाच्या उमेदवारांबरोबर बसपा प्रदेश सचिव दयानंद किरतकर आणि पदाधिकारी आले होते.
कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण १४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यातील पाच उमेदवारांनी सोमवारी डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार रवींद्र केणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.भारतीय वंचित आघाडीचे उमेदवार संजीव हेडाव यांनी आर्ज भरला.तसेच अपक्ष म्हणून दोन उमेदवारांनी अर्ज भरले. आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, संजीव नाईक आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे आणि नवीन सिंग, माजी नगरसेविका शारदा पाटील, सचिन पोटे,ज्योती कलानी, आमदार जगन्नाथ शिंदे,डॉ.वंडार पाटील, जिल्हाअध्यक्ष रमेश हनुमंते आदीसह अनेक पदाधिकारी आले होते. पाटील यांनी प्रथम श्री गणेशाचे दर्शन घेऊन पायी चालत क्रीडा संकुल येथे आले. त्यांच्याबरोबर आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झेंडे घेऊन क्रीडा संकुला बाहेर प्रचंड गर्दी केली होती.