मुंबई : ८ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील ५ या मजल्यावर स्मार्ट मैत्रिण अभियानाचे आयोजन करणयात आले होते. या आयोजनाअंतर्गत सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीनचे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या पत्नी श्रीमती बर्वे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सदर अभियान मुंबई पोलीस दलातील सर्व पोलीस ठाणे, विभागीय कार्यालय व सर्व शाखा अशा एकूण १४० सॅनिटरी नॅपकीन मशीन महिला पोलिसांसाठी बसवण्यात आल्या आहेत.
”स्मार्ट मैत्रिण अभियान’ कार्यक्र्रमाला श्रीमती बर्वे, सह. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या पत्नी श्रीमती डुमरे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय – ०२) श्रीमती एन. अंबिका, उपायुक्त (स.पो. नायगाव) श्रीमती नियती ठाकरे यांच्यासह स्मार्ट मैत्रिण अभियानाचे अध्यक्ष श्री राजेंद्र धेंडे व महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते.