ठाणे

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्याची रेकॉर्ड ब्रेक गर्दी…

डोंबिवली : शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी डोंबिवलीतील क्रीडा संकुल येथील मुख्य निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.यासाठी कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती.तसेच आगळ्यावेगळ्या पद्धतीने, पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत असतानाच डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मात्र हजारो कार्यकर्त्यांच्या या शक्तीचा उपयोग पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी करून वृक्षारोपण करून अर्ज दाखल केल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

डॉ. शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने संपूर्ण डोंबिवली शहर भगवेमय झाले होते. हजारो शिवसैनिक, भाजप कार्यकर्ते आणि भीमसैनिकांच्या उपस्थितीत, मोठ्या जल्लोषात डॉ. शिंदे यांनी अर्ज दाखल केला. याप्रसंगी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते रवींद्र चव्हाण, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, महापौर विनिता राणे, आमदार रवींद्र फाटक, सुभाष भोईर, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रल्हाद जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, भाजपचे कल्याण लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष संजीव बिरवाडकर, डोंबिवली पश्चिम मंडळ सचिव हरीश जावकर, पवन पाटील आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. फडके रोड येथील श्री गणेश मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्यानंतर तेथील उद्यानात वृक्षारोपण करून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीतही पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा रथ लोकांचे लक्ष वेधून घेत होता. गेली दोन वर्षे डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन अंबरनाथ तालुक्यात लोकसहभागातून दीड लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली .

शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक निघून शिवघोषाच्या गजरात सावळाराम क्रीडा संकुलात दाखल झाली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयघोषाने डोंबिवली शहर दुमदुमून निघाले. मिरवणुकीदरम्यान महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीतील महिलांचे लेझिम पथक, ढोलताशांचे पथक, आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!