ठाणे

सुगम्य निवडणूका : दिव्यांग मतदारांच्या सुविधांसाठी सुक्ष्म नियोजन करा – जिल्हा निवडणूक अधिकारी नार्वेकरांचे निर्देश

ठाणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांसाठी ‘सुगम्य निवडणूका’ हे धोरण राबविण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी  ठाणे जिल्ह्यातील तिनही लोकसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांना मतदान करणे अधिक सुलभ व सोपे व्हावे यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे दिले.

दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी येणे व जाणे यासाठी सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात घेण्यात आला. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण प्रसाद खैरनार तसेच नोडल अधिकारी , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , तसेच  जिल्ह्यातील महानगरपालिकांचे परिवहन अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी नार्वेकर यांनी सुचना केली की, आपापल्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रनिहाय दिव्यांग मतदार संख्या, तसेच त्यांचे मतदान तळ मजला, पहिला मजला याप्रमाणे नेमके कोठे आहे याची सखोल माहिती घ्यावी. मतदारांचे घर ते मतदान केंद्र, मतदान केंद्र आवार ते प्रत्यक्ष मतदान बूथ या दरम्यानचे दिव्यांग मतदाराचे आवागमन हे सुलभ झाले पाहिजे यासाठी नियोजन करावे. त्यासाठी लो फ्लोअर बसेस, रिक्षा सेवा घेण्यात यावी. तसेच व्हील चेअरची उपलब्धता करण्यात यावी. तसेच जेथे लिफ्ट नसेल अशा ठिकाणी  डोली करुन मतदारांना नेण्यात यावे. त्याप्रमाणे सुविधांची सज्जता ठेवावी. या सुविधा महापालिका क्षेत्रात वार्ड स्तरावर उपलब्ध करुन द्याव्या. त्यासाठी जे समन्वयक नेमले जाणार आहेत. त्यांची माहिती ही दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशा सुचनाही नार्वेकर यांनी संबंधितांना दिल्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!