डोंबिवली : सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता जेष्ठ समाज सेविका ज्योती पाटकर यांचे अल्पश्या आजारानै दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ६८ वर्षे होते. मुक्ता बालिका आश्रम विरंगुळा केंद्र टिटवाळा यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. तसेच भाजपच्या माजी जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले होते. पक्ष संघटना सक्षम केली. मुक्ता बालिकाश्रात सध्या २८ मुली आहेत. परिवर्तन महिला संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या प्रश्नांसंदर्भात भरीव काम केले आहे. महिलाविषयी त्यांना आत्यंतिक तळमळ होती. परिवर्तन महिला संस्थेच्या माध्यमातून जननी आशीष या संस्थेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरु केले . पूर्वेकडील रामनगर येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आला.
जेष्ठ समाजसेविका ज्योती पाटकर यांचे निधन
April 15, 2019
117 Views
1 Min Read

-
Share This!