ठाणे

स्टिकर्स, सह्यांच्या माध्यमातून मतदानाचे आवाहन; गॅस सिलेंडरद्वारेही संदेश पोहोचणार घराघरात

ठाणे  लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी  स्वीप उपक्रम राबविला जात आहे. मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काप्रति जागृती करणे, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातच एक मोबाईलला स्टिकर लावून जनजागृती करणे व मान्यवरांच्या सह्या घेऊन त्यांना आवाहन करणे हा उपक्रम लक्षवेधी ठरला आहे.

स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी रेवती गायकर व त्यांचे सहकारी मुकूंद गणेश सराफ यांच्या संकल्पनेतून  हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक सरकारी कार्यालय, खाजगी आस्थापनांना भेटी देऊन  लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मोबाईल हॅण्डसेटच्या पाठच्या बाजूला ‘29 एप्रिल रोजी कोणालाही करा,मतदान करा.’ हे स्टिकर लावून दिले जाते. त्यामुळे जेव्हा आपण मोबाईल कानाला लावून बोलतो तेव्हा समोरचा व्यक्ती तो संदेश सहज वाचू शकतो. या शिवाय एका डायरीत स्टिकर चिकटवून त्याखाली मान्यवरांच्या स्वाक्षरी नोंदवून त्यांना मतदान करण्याबाबत आवाहन केले जातेय. यात स्वतः जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, 24 कल्याणचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्यासह प्रशासनातल्या तसेच खाजगी आस्थापनांवरील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले.

युवा वर्गा पर्यंत हा संदेश त्यांना आवडेल अशा पद्धतीने  पोहोचविण्यात येत आहे. त्यांना आय लव्ह इंडीया, आय लव्ह टू वोट, हा संदेश छान पिंक हार्ट शेप आकारात देण्यात येत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुण तरुणींनी हा संदेश लगेचच स्विकारला, नव्हे तर तो लगेचच आपल्या मित्र मैत्रिणींना प्रसारीत ही केला.

या शिवाय रस्त्यांवरील खांब, घरोघरी जाणाऱ्या गॅस सिलींडरवर गृहिणींना आवाहन करणारे स्टिकर्स लावून पाठविण्यात येत आहेत. यात मराठी सोबत हिंदी, उर्दू, इंग्रजी, सिंधी या भाषांचा वापरही या संदेशात केला जात आहे. मतदारांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी ही अभिनव कल्पना मतदारांनीही वाखाणली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!