कल्याण :- साऊथ आफ्रिकेमधील दिग्गज क्रिकेटर तसेच अलबी मोर्कल व मॉर्निं मोर्कल टेस्ट प्लयेर( साउथ अफ्रीका) या बंधूचे वडील व क्रिकेट गुरू आणि साऊथ आफ्रिका चे प्रशिक्षक व कसोटीपटू अल्बर्ट मॉर्कल हे कल्याणच्या क्रिकेट शिबिरासाठी उपस्थित राहणार असून या शिबिरामध्ये उदयोन्मुख खेळाडूंना ते मार्गदर्शन करणार आहेत कल्याणच्या संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी च्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये महाराष्ट्र मधील निवडक खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे गत 12 वर्षापासून या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी अल्बर्ट मॉर्कल यांना बोलावून महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे धडे देण्याचा उपक्रम संतोष पाठक यांनी आखला आहे कारण भारतातील खेळाडू परदेशात जाऊन क्रिकेट प्रशिक्षणा चे धडे गिरवत असतात पण सर्वसामान्यांना हे परवडत नाही त्यामुळे प्रति वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळाडू आपल्याकडे बोलावून आपल्या खेळाडूंना प्रशिक्षण उपलब्ध करून दिले तर त्याचा मोठा फायदा आपल्या खेळाडूंना होतो असे संतोष पाठक यांनी सांगितले हे क्रिकेट शिबीर कल्याणच्या संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी, आधारवाडी क्रिकेट मैदान येते होणार आहे. हे शिबीर 25 एप्रिल ते 3 मे पर्यंत असणार आहे या शिबिरामध्ये 6 ते 18 या वयोगटातील मुलां – मुली ना या प्रशिक्षणा लाभ घेता येणार आहे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सहा विविध गट तयार करण्यात येणार असून हे शिबीर सकाळी 7 ते 10 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत घेतले जाणार आहेत असे संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी चे कोच संतोष पाठक यांनी सांगितले. हे शिबीर आयोजित करण्यासाठी मा. आमदार संजय दत्त व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव ब्रिज दत्त यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक 9870429041 येथे संपर्क साधावा
अल्बर्ट मॉर्कल ची कल्याण च्या क्रिकेट शिबीरा साठी उपस्थिती
April 16, 2019
45 Views
2 Min Read

-
Share This!