ठाणे : लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवार दि. 29 एप्रिल रोजी मतदान व गुरुवार दि.23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये 23-भिवंडी ,24-कल्याण, 25-ठाणे असे तीन लोकसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी त्या त्या ठिकाणी व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या चहुबाजूने 100 मीटर परिसरात कलम 144( 1) अन्वये पोलीस आयुक्त ठाणे शहर विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश दिले आहेत. या अन्वये या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , प्रतिनिधी बैठक, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.सदर आदेश शनिवार दि.27 एप्रिल मध्यरात्रीपासुन ते गुरुवार दि.23 मे रोजी मध्यरात्री पर्यंत किंवा मतमोजणी प्रक्रिया संपुष्टात येईपर्यंत अंमलात राहिल,असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कळविले आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.