मुंब्राः मुंब्रा पोलीस स्टेशन (गु.र.नं. 267/2018) भादवि प्रमाणे दि. 17 मे 2018 रोजी दाखल पळवून नेलेल्या मुलीचे नाव मुन्नी उर्फ तब्बसुनिसा मुबीन खान, वय 6 वर्ष, वर्णन — अंगाने मध्यम, चेहरा — गोल, डोळयाचे केस — भोरे व छोट्या केसांची दोन्ही बोनी बाांलेली, डोळे — काळे, नाक — सरळ, रंग — गोरा, उंची — 3 फुट 2 इंच तसेच गळयाच्या खाली छातीच्या वर जखमेची खूण आहे. नेसुस — तपकिरी रंगाचा पायजमा, हाफ टिशर्ट तिच्यावर लाल रंगाचे व पांढर्या रंगाचे पट्टे असलेले, पायात चप्पल नाही.
सदर मुलगी 15 मे 2018 रोजी दुपारी 3च्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील एम गेटच्या खाली मोकळया जागेत खेळत असताना तिला अज्ञात इसमाने पळवून नेले आहे. सदर मुलीची माहिती मिळून आल्यास मुंब्रा पोलीस स्टेशन, फोन नंबर 022 — 25462355 / 25468315 अथवा पोलीस कंट्रोल रुम येथे 100 नंबरवर फोन करुन माहिती कळवावी.