डोंबिवली :- दि. १७ ( प्रतिनिधी ) श्री जैन एलर्ट ग्रुपच्या वतीने महावीर जयंती निमित्ताने डोंबिवलीत ताक व गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. महावीर जयंती निमित्त डोंबिवली येथील संत नामदेव पथ येथे श्री जैन एलर्ट ग्रुपच्याच्या वतीने मोफत व गोड पदार्थ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी भावेश मेहता, मधुकर शहा, राजेश मारु, वर्षा परमार, चिंतन शहा, जतीन शहा, भावेश मेहता, अनिल ठक्कर मान्यवर उपस्थित होते. याबाबत भावेश मेहता म्हणाले की, महावीर जयंती हा जैन धर्मीयांच्या अनेक सणातील एक सण आहे. हा सण शेवटचे तीर्थकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित साजरा करण्यात येतो.मोठ्या संख्येने जैन श्रध्दाळू हा सण साजरा करतात.लोकांनी आपले वैरभाव विसरून विवेकाने व संयमाने वागावे अशी त्यांची शिकवण होती.काही जैन समुदाय अहिंसा रँली आयोजित करतात. तर काही ठिकाणी अन्नदानाचे वाटप केले जाते. महावीर जयंती निमित्ताने आज पासून पन्नास दिवस डोंबिवलीतील विविध भागात दररोज फक्त ताकाचे मोफत.वाटप करण्यात येईल त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. श्री जैन एलर्ट ग्रुपच्या गरिबांना अन्नदान करण्यात येते. एका गरीबाला श्री जैन एलर्ट ग्रुपमी मदत केल्याने तो आज चायना येथे आपले जीवन सुखाने जगत आहे. आपल्या सारख्या इतर गरिबांनाही या ग्रुपच्या वतीने आर्थिक मदत मिळावी म्हणून याने काही रक्कम या ग्रुपला दिली आहे. याबद्दल श्री जैन एलर्ट ग्रुपने त्याचे आभार मानले आहेत.
महावीर जयंती निमित्त ताक व गोड पदार्थांचे वाटप..
April 17, 2019
57 Views
1 Min Read

-
Share This!