डोंबिवली : ( शंकर जाधव ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट झाला असून हातभट्टीच्या अवैध अड्ड्यावर धाडी टाकण्याच्या मोहीम हाती घेतली आहे आज पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवलीच्या पथकाने दिवा नजीक आगासने येथे अवैध पणे सुरु असलेल्या हातभट्टी च्या अड्ड्यावर धाड टाकत हजारो लिटर गावठी दारूसह ३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त ,तिघांना अटक केली आहे
राज्य उत्पादन विभागच्या डोंबिवली विभागाला आगासन गावच्या खाडी किनारी लगत अवैद्य हातभट्टी बनवली जात असून गावठी दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती आज सकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागच्या डोंबिवली विभागाने छापा मारत ११२० लिटर हातभट्टी गावठी दारू सह १० हजार चारशे लिटर गुळ नवसागर मिश्रित रसायन ,दोन फायबर होड्या .एक सतेले ,एक चाटू ,दोन प्लास्टिक पाईप ,एक हायड्रो मीटर थर्मा मीटर असा एकूण ३ लाख ७७ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करत ललन पासवान ,राजकुमार साव या दोघांना अटक केली आहे .या दरम्यान मुख्य आरोपी कृष्णा मुंडे हा फरार होता मात्र काही वेळाने तो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोंबिवली कार्यलयात हजर झाला .या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले .लोकसभा निवडनुक असल्याने मोठ्या प्रमाणात गावठी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने गावठी दारू या ठिकाणी बनवण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे हि कारवाई निरीक्षक अनिल पवार ,दुय्यम निरीक्षक श्रीकांत खरात ,सुनील कोळी ,दीपक खडसे ,हनुमंत देवकते .अश्विनी भोसले याच्या पथकाने केली तर