ठाणे, दि. 22 _ ग्राहकांच्या समस्या आणि अडचणी जाणून त्यांचे शासकीय स्तरावर निराकारण करणार्या अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या (भारत सरकार न्यायविधी कं मामले मंत्रालय द्वारा मान्यता प्राप्त) ठाणे जिल्हा अध्यक्षपदी ठाण्यातील उद्योजक रविंद्र शर्मा यांची नियुक्त ठाणे ग्रंथ संग्रहालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आली. संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नंदाताई वास्के यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सचिव बाळासाहेब पांडे यांच्या हस्ते रविंद्र शर्मा यांना नियुक्तपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भगवान बागुल, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष नंदाताई वास्के, नाथा पाटील, शलाका नाईक पेंढारकर व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाण्यातील व्यापार्यांचे संघटन, ग्राहकांच्या खरेदी-विक्रीत येणार्या अडचणी, त्या सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर करण्यात येेणारे कार्य, सामान्य नागरिकांच्या समस्या व ठाण्यातील उद्योग क्षेत्रात छोट्या-मोठ्या उद्योगांना चालना देण्यात यशस्वी ठरलेले सामाजिक कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शर्मा यांच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र शर्मा यांच्यावर ठाणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे ठाणे जिल्हा ग्राहक व व्यापारी संघटनांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी रविंद्र शर्मा यांची नियुक्ती
