कल्याण : तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करून कल्याण क्राईम ब्राँचने यशस्वी कामगिरी केली आहे. अनंता मारुती म्हात्रे असे या गुन्हेगाराचे नाव असून हा गुन्हेगार मानपाडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील खतरनाक सराईत गुन्हेगार आहे. सदर गुन्हेगारास मानपाडा पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरून एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते. तरीसुद्धा हा गुन्हेगार सूचक नाका रवी ऑटो सेंटर कल्याण पूर्व येथे आज दुपारी 12.00 ते 1.00 वा. दरम्यान एका मित्राला भेटायला येण्याची बातमी कल्याण क्राईम ब्राँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली. या बातमीवरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.संतोष शेवाळे पो.उप.निरी.निलेश पाटील, ए.एस.आय साळुंखे, पोलीस-हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद खिलारे, सतीश पगारे, अजित राजपूत, बाळा पाटील आणि अरविंद पवार अधिकारी व कर्मचारी यांनी सदर भागात सापळा रचून त्याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून मानपाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदर आरोपीवर 2016 मध्ये मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये 1) रॉबरी गुन्हा 2) मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये दरोडा घालण्याची तयारी 3) नारपोली पोलीस स्टेशन भिवंडी येथे रॉबरीचा गुन्हा अशा प्रकारे तीन गुन्हे दाखल आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक
April 22, 2019
40 Views
1 Min Read

-
Share This!