महाराष्ट्र

  DYSP आणि आमदार यांच्यात खडाजंगी

कोल्हापूर :  मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या आत थांबण्याच्या कारणावरून कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील सरपंच आणि इतरांना पकडून गाडीत बसविण्याच्या कारणावरून गोंधळ उडाला. यावेळी संबंधितांना अटक करण्याचा जाब विचारणारे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सरपंच रणजित कांबळे, अमोल माळी, अजित शेटे, मंजुनाथ वराळे, प्रकाश शिनगारे आदींना कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील शेती व्यवसाय विद्या मंदिर मतदान केंद्राच्या आवारात सकाळी नऊच्या सुमारास १०० मीटर अंतराच्या आत थांबण्याच्या कारणावरून पकडून गाडीत बसविले. त्या कारणावरून गोँधळ उडाला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!