डोंबिवली : मुंबईसह ठाणे ,पालघर , कल्याण व भिवंडी या विविध ठिकाणी लोकसभेची निवडणूक येत्या २९ एप्रिल रोजी मोठ्या चुरशीची होणार आहे. अनेक कोळी संघटनांची शिखर संघटना असलेला कोळी महासंघाने महायुतीला आपला पाठींबा जाहीर केला आहे त्यानुसार शहर परिसरातील कोळीवाड्यांना भेटी देत असल्याची माहिती कोळी महासंघाचे अध्यक्ष व विधानपरिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी दिली.
कोळी बांधवांना भेडसावणारी मुख्य समस्या एलईडी विद्युत प्रकाश झोतातील मासेमारी व परसेन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्यां विरोधात कोणी दोषी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबधित खात्याला दिले असल्याची महिती दिली सांगत भाजपा महायुती मागे कोळी बांधवांनी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भिवंडी लोकसभा मतदार संघातील कल्याण पश्चिमेकडील बारावे ,अटाळी ,शहाड ,वाडेघर ,गांधारी ,मोठे शहाड ,धाकटे शहाड ,,वडवली ,मोहने ,गाळेगाव ,उंबारणी ,मांडा टिटवाळा , सांगोडे ,नानकर ,खिरवली आदी अनेक ठिकाणी जावून भिवंडी मतदार संघाचे भाजपा उमेदवार कपिल पाटील यांनी प्रत्येक कोळीवाडा व कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी आमदार रमेश पाटील ,कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर ,कोळी समाज बेंड पथकाचे संयोजक राजू भंडारी यांच्या सह असंख्य कोळी बांधव सहभागी झाले होते तसेच कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आमदार रमेश पाटील यांनी कल्याण पूर्वेतील कचोरे नेतिवली ,नांदिवली ,बाला गाव ,निळजे ,दिवा दातिवली ,अंबरनाथ ,शहाड गावठण आदी विविध ठिकाणी पदयात्रेद्वारे कोळी बांधवांशी संवाद साधला व महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले .गेल्या पन्नास वर्षात कॉंग्रेसच्या कालावधीत कोळी बांधव सर्व सेवासुविधा पासून वंचित होता पण भाजपा सेना युतीच्या कालावधीत मात्र अनेक समस्यांचे निवारण मुख्यमंत्र्यांनी केले व आगामी काळात देखील करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले .कल्याण व भिवडी लोकसभा क्षेत्रात सुमारे दीड लाख कोळी बांधव असून आम्ही सर्व महायुतीच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांनी यावेळी सांगितले कपिल पाटील व श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.