
ठाणे : कला व संस्क्रुती संचनालय , गोवा संरकार आणि कैलासद्वार ओम चैतन्य गगनगिरी आश्रम यांच्या वतीने कैलासनगर, अस्नोडा ,बार्देश -गोवा येथील गगनगिरी महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा त्रुतीय वर्धापनदिन नुकताच पार पडला . यानिमित्त धार्मिक विधी व गगननगिरी महायोगी पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन जेष्ठ मान्यवर , संत महंतयांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.त्यात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख मुंबई सुभाष देसाई यांच्या हस्ते जेष्ठ कवी,समाजसेवक व पत्रकार बाळासाहेब तोरस्कर यांना गगनगिरी महायोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हा प.पू .स्वामी दिपकगिरी महाराज दाजीपुर, डाँ. गोविंद पालकर सल्लागार समिती सदस्य विश्वशांती केंद्र आळंदी . गजानन पाटील गोवा ,डाँ. अनिल मुळीक, नीलेश गडेकर संस्थेचे सचिव गोवा , आशिश महाराज अधिपती खोपोली ,संस्थेचे अध्यक्ष क्रुष्णा कांदोळकर, बापुसाहेब उर्फ शांताराम पाटणकर अधिपती गगनगड, समाजसेविका सौ सुनिता काटकर आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी शंकर शिंदे , दिनेशभाई सेठिया आदिना सन्मानित करण्यात आले. शाल ,श्रीफळ,सन्मानचिन्ह ,मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते
तोरस्कर यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांंना अनेक नामांकित राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते अनेक सामाजिक व सांस्क्रुतिक संस्थांचे संस्थापक व पदाधिकारी आहेत.
त्यांचे आकाशवाणी ,दूरदर्शनवर काव्य वाचन, वर्तमानपत्रे व विविध नियतकालिकातून तसेच नामांकित दिवाळी अंकातून लेख, कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक शाळा,महाविद्यालयात प्रमुख अतिथीचा मान मिळाला आहे. ते नक्षत्राचं देणं काव्यमंचचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्र मुंबई जिल्हा अध्यक्ष आहेत .यापूर्वी त्यांना कनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. समाजातील विविध थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,