विश्व

पोएट्री मॅरेथॉन या उपक्रमाला केवळ मॅरेथॉन न म्हणता काव्य महोत्सव वा आनंद महोत्सव…  – भारतकुमार राऊत

डोंबिवली : पोएट्री मॅरेथॉन या उपक्रमाला केवळ मॅरेथॉन न म्हणता काव्य महोत्सव वा आनंद महोत्सव म्हटले पाहिजे कारण मॅरेथॉनला शेवट आहे आणि कवितेला शेवट नाही ,जिथे कविता संपेल तिथे सर्व काही संपते. त्यामुळे हा या काव्य महोत्सवी पर्वाचां शेवट आहे हे स्फुल्लिंग असेच तेवत ठेवले पाहिजे. देश फक्त कायद्यावर चालत नाही त्यासाठी प्रत्येकाच्या मनात स्पिरीट लागते. दिवसभर दमल्यावर रात्री स्वप्न बघायचं स्पिरीट ही कविता शिकविते” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व खासदार भारतकुमार राऊत यांनी पोएट्री मॅरेथॉन एक काव्य महोत्सव च्या समारोप प्रसंगी केले.
     अखिल भारतीय कला क्रीडा व सांस्कृतिक अकादमी च्या वतीने अखंड ८५ तास काव्य महोत्सवाचे आयोजन १८ एप्रिल ते २१ एप्रिल या चार दिवसांमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र पैं म्हणाले,आपल्याकडे लक्ष्मी व इतर सर्व देवींची मंदिरे आहेत पण सरस्वतीचे मंदिर अभावाने असते. माझ्या मुंबईतील ऑफिसजवळ एक सरस्वतीचे मंदिर आहे. दुसरे मी या संकल्प इंग्लिश स्कूल मधील पोएट्री मॅरेथॉन मध्ये पाहिले.यावेळी पै यांनी संस्थापिका साक्षी परब , कार्याध्यक्ष डॉ राज परब , उपक्रम प्रमुख डॉ योगेश जोशी , समन्वयक हेमंत नेहेते व कार्यवाह डॉ ज्योती परब यांचे कौतुक केले.
     ख्यातनाम हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या दमदार कवितांनी व  मिश्किल भाषणाने कार्यक्रमात रंगत आणली. सॅ न्होजे मधील मराठी मंडळीनी त्यांची मैफल कशी आयोजित केली हे सांगून ते आपल्या भाषणात म्हणाले, मराठी भाषा ही मुंबई , शिवाजी पार्क , विलेपार्ले येथे नाहीशी होत आहे असे वाटत असले तरी परदेशात मात्र मराठी भाषेची केंद्रे अस्तित्वात येत आहेत ही एक शुभचिंतक गोष्ट आहे.  मी चेंबूर मध्ये ४० वर्षे राहत आहे. लहान मुलांचे आपण गुन्हेगार आहोत, आपण त्यांच्यावर वाचन संस्कार करण्यात कमी पडत आहोत. दर रविवारी हॉटेल व पार्ट्यांवर आपण हजारो रुपये खर्च करतो, त्याबरोबर एखादा कवितासंग्रह विकत घ्यावा म्हणजे पुढच्या पिढीत मराठी भाषा जिवंत राहाण्यास मदत होईल.काव्य महोत्सवाचे उद्घाटन डॉ. महेश केळुस्कर , डॉ विजया वाड व शशिकांत तिरोडकर यांचे हस्ते करण्यात आले . स्वागताध्यक्ष ख.र. माळवे व प्रा.दिनेश गुप्ता यांच्या हस्ते केशवसुत कवी कट्टा कविता संग्रह प्रदर्शन व आठवणीतील कविता या दोन प्रदर्शनाचे उद्घाटन आले . स्पर्शाकीत संस्थेच्या पाच अंध कवींनी कविता  सादर होऊन या काव्य महोत्सवास सुरुवात झाली . अखंड ८५ तास चाललेल्या या काव्य महोत्सवात महिला, पोलीस कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विशेष सत्र ज्ञानदिप विद्या मंदिर मुंब्रा व ज्ञानदिप कॉन्व्हेन्ट स्कूल यांचे वतीने आयोजित करण्यात आले होते. या सत्राचे संपूर्ण नियोजन  विद्यार्थ्यांनी , शाळेचे अध्यक्ष सतीश  देसाई,सेक्रेटरी समीर देसाई व सदस्या  शिवानी देसाई व प्रवीणा देसाई आणि मुख्याध्यापिका उषा शिंदे यांचे मार्गदर्शनाने केले होते. अध्यक्ष ईश्वरी पाटील , प्रमुख पाहुणे दिवेश मेदगे , साईराज परब , पारस नेहेते , वैष्णवी कांजळे यांच्या सोबत नमिता कोरडे , रिद्धी डहाळे , महिमा दळवी , तेजस्वी नाईक , मानसी चव्हाण, साई शिगवण , वैष्णवी डहाळे , आदिती पांडे, श्रावणी शिरगावकर, हर्षाली रोकडे, सुमित कांबळे , प्राची जांभळे , साबिया खान , सुहानी पाटील , वैदेही विरागुड यांनी कविता सादर केल्या. संकल्प इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी अशा विविध सत्रांचं आयोजन करण्यात आले होते . अशोक बागवे, रेखा नार्वेकर, गौरी कुलकर्णी, शामसुंदर सों न्नार, संपदा जोगळेकर कुलकर्णी, प्रशांत डिंगण कर, सुरेश ठामासे, दिपक पळसुले, कैलाश म्हापदी, अशोक चिटणीस आदी मान्यवरांनी हजेरी लावून आपल्या कविता सादर केल्या.
    गदिमा, पुल देशपांडे, विंदा करंदीकर यांच्या कट आऊट चा सेल्फी कॉर्नर प्रत्येकाचे आकर्षण ठरला  . या महोत्सवात ४५ सत्रांमध्ये ११०० कवींनी कविता सादर करून विश्व विक्रम केला. या विक्रमाची नोंद आसाम बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड, ब्राहो  बुक ऑफ रेकॉर्ड, टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या विक्रमाची नोंद प्रक्रिया सुरू आहे. काव्य महोत्सवाचे उपक्रम प्रमुख डॉ योगेश जोशी, डॉ राज परब,डॉ ज्योती परब , हेमंत नेहेते, साक्षी परब यांच्या सोबत साईराज परब, राजेंद्र गोसावी, जयंत भावे, डॉ प्रकाश माळी , वृषाली शिंदे, आरती कुलकर्णी, निशिकांत महांकाळ यांनी विशेषत्वाने सहकार्य केले. अक्षर मंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,आनंद कल्याणकारी  सामाजिक संस्था, कोमसाप ठाणे जिल्हा, साई इव्हेंट, ओम साई शंकर शिक्षण प्रसारक संस्था, सी इंडिया चॅनेल चे साईराज परब, ऋतु फूड, अरिहंत युनिफॉर्म, डॉ. शांताराम कारंडे फाऊंडेशन , जाई काजळ , जनकल्याण बँक, भरत शिंदे, प्रमोद सावंत, खर्डिकर क्लासेस, जे. के. फाऊंडेशन, लक्ष्मी केटरर्स, रवींद्र परब यांनी या उपक्रमासाठी विशेष योगदान दिले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन ,आभार प्रदर्शनाची जबाबदारी सत्र नंबर २ मधील  विद्यार्थ्यांनी सांभाळली

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!