महाराष्ट्र

लोकसभा निवडणूक मतदानाचा शेवटचा टप्पा : १७ मतदारसंघात ३३ हजार ३१४ मतदान केंद्र, ३ कोटी १२ लाख मतदार

मुंबई, दि. 25 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये29 एप्रिल रोजी राज्यातील 17मतदारसंघामध्ये मतदान होत आहे.3 कोटी 11 लाख 92 हजार823मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख31 हजार पुरुष तर 1 कोटी 45लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102विधानसभा मतदारसंघ असून 33हजार 314 मतदान केंद्र आहेत. सुमारे 1 लाख 7 हजार 995ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरु आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.’सखी’ मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर,पिण्याच्या पाण्याची सुविधा,सावलीसाठी मंडप अशा सोयी यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.

नंदूरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.), नाशिक, पालघर (अ.ज.),भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर,मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व,मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य,मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी (अ.जा.) या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या :

नंदूरबार- 18 लाख 70 हजार117 ( पुरुष-9 लाख 43 हजार745, महिला- 9 लाख 26 हजार350), (मतदान केंद्र-2115) ;

धुळे- 19 लाख 4 हजार 859 (पुरुष-9 लाख 93 हजार 903,महिला-9 लाख 10 हजार 935), (मतदान केंद्र-1940) ;

दिंडोरी- 17 लाख 28 हजार 651 (पुरुष- 9 लाख 1 हजार 82,महिला-8 लाख 27 हजार 555), (मतदान केंद्र-1884) ;

नाशिक- 18 लाख 82 हजार 46 (पुरुष- 9 लाख 88 हजार 892,महिला- 8 लाख 93 हजार 139), (मतदान केंद्र-1907) ;

पालघर- 18 लाख 85 हजार297(पुरुष- 9 लाख 89 हजार,महिला- 8 लाख 96 हजार 178), (मतदान केंद्र-2170) ;

भिवंडी-  18 लाख 89 हजार 788 (पुरुष- 10 लाख 37 हजार 752,महिला- 8 लाख 51 हजार 921), (मतदान केंद्र-2200) ;

कल्याण- 19 लाख 65 हजार131 (पुरुष- 10 लाख 61 हजार386, महिला 9 लाख 3 हजार473), (मतदान केंद्र-2063) ;

ठाणे- 23 लाख 70 हजार 276 (पुरुष- 12 लाख 93 हजार 379,महिला-10 लाख 76 हजार 834), (मतदान केंद्र-2452) ;

मुंबई उत्तर- 16 लाख 47 हजार208 (पुरुष- 8 लाख 90 हजार,महिला – 7 लाख 56 हजार 847), (मतदान केंद्र- 1715) ;

मुंबई उत्तर-पश्चिम – 17 लाख 32हजार (पुरुष – 9 लाख 50 हजार302, महिला – 7 लाख 81 हजार765), (मतदान केंद्र-1766) ;

मुंबई उत्तर-पूर्व- 15 लाख 88हजार 331 (पुरुष – 8 लाख 64हजार 646, महिला – 7 लाख 23हजार 542), (मतदान केंद्र -1721) ;

मुंबई उत्तर-मध्य- 16 लाख 79हजार 732 (पुरुष-9 लाख 16हजार 627 महिला- 7 लाख 63हजार), (मतदान केंद्र-1721);

मुंबई दक्षिण-मध्य- 14 लाख 40हजार 142  (पुरुष- 7 लाख 77हजार 714, महिला- 6 लाख 62हजार 337), (मतदान केंद्र- 1572) ;

मुंबई दक्षिण- 15 हजार 53 हजार925  (पुरुष- 8 लाख 54 हजार121, महिला- 6 लाख 99 हजार781), (मतदान केंद्र-1578) ;

मावळ- 22 लाख 97 हजार 405  (पुरुष- 12 लाख 2 हजार 894,महिला- 10 लाख 94 हजार 471), (मतदान केंद्र- 2504) ;

शिरुर- 21 लाख 73 हजार 527  (पुरुष- 11 लाख 44 हजार 827,महिला- 10 लाख 28 हजार 656), (मतदान केंद्र-2296);

शिर्डी- 15 लाख 84 हजार  (पुरुष-8 लाख 21 हजार 401, महिला- 7लाख 62 हजार 732), ( मतदान केंद्र-1710).

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!