मुंबई : “शब्दमोती साहित्य मंच, मुंबई” आयोजित “साहित्यजल्लोष” हा कार्यक्रम निमंत्रित साहित्यिक आणि साहित्यरसिकांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ह्या साहित्यजल्लोषात रसिकांना दर्जेदार साहित्यिकांच्या कथा , कविता तसेच ललित अभिवाचनाचा आस्वाद घेता आला. सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. गुरुदत्त वाकदेकर ह्यांना ह्या कार्यक्रमादरम्यान “साहित्य भूषण” सन्मानाने गौरविण्यात आले. सन्माननीय साहित्यिका आणि शब्दवेल साहित्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डाॅ. पल्लवी बनसोडे ह्यांनी प्रमुख पाहुण्यांचं पद भूषविले व उपस्थितांना सुरेख मार्गदर्शन करून सर्वांची मने जिंकली.
तत्पूर्वी अशोक कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, मानसी नेवगी, कीर्ती पाटसकर, श्लोक पाटसकर, प्रमोदिनी देशमुख, रजनी निकाळजे, प्राची राजे, प्राची मुळीक, अरविंद देशपाडे, सुलभा कुलकर्णी, विजय फडणीस, अजित महाडकर, विकास भावे, वैजयंती गुप्ते, अनिल सांगळे, सुरेश कुलकर्णी, कल्पना म्हापुसकर, मनिषा ताम्हणे, संतोष मोहिते, नमिता आफळे, स्वाती दामले, ईशान संगमनेरकर, सुलभा कुलकर्णी, गिरीश ताम्हाणे, गिरीश ताम्हाणे आदी मान्यवरांनी स्वलिखित कविता व कथांचे अभिवाचन करुन कार्यक्रमाचा आलेख सतत उंचावत ठेवला. श्री. श्रीराम वैद्य ह्यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. रंगांच्या क्षेत्रात अग्रस्थानी असलेले “कामत पेन्ट्स” हे ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते,
“साहित्यसेवेचा अविरत वसा” हे ब्रीदवाक्य असलेल्या “शब्दमोती साहित्य मंच” च्या अध्यक्षा सौ. स्वाती शृंगारपुरे व कार्याध्यक्ष श्री. शकील कर्णिक ह्यांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजुक्ता शृंगारपुरे, सुबोध शृंगारपुरे, सीमा कर्णिक व गायत्री कर्णिक यांनी विशेष मेहनत घेतली.