ठाणे

मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक

ठाणे, दि. 26  लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करण्यासाठी मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र आवश्यक असून ते नसल्यास खालीलपैकी कोणतेही एक दस्ताऐवज हे ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.

याबाबत आवाहन करण्यात आले आहे की, मतदानाचा  हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्येआपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे. मात्र मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) नसेल तर मतदाराने खालील पैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदार केंद्रावर सादर करावे.

1.पासपोर्ट

2 .वाहन चालक परवाना (ड्राइव्हिंग लायसन्स )

3.छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन /सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)

4.छायाचित्र असलेले बॅकेचे पासबुक

5.पॅनकार्ड

6.NPR अंतर्गत RGI द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड

7.मनरेगा कार्यपत्रिका

8.कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

9.छायाचित्र असलेले निवृतीवेतन दस्तावेज

10.खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

11.आधारकार्ड

केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत  आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. याबाबत मतदारांनी आपले नाव नोंदणी अथवा पडताळणीसाठी www.nvsp.in   या संकेतस्थळावर भेट द्यावी.  मतदारांना देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, तर त्यासोबत  मतदार छायाचित्र ओळखपत्र  अथवा वर दिलेल्या 11 दस्ताऐवजांपैकीकोणतेही एक दस्ताऐवज सादर करणे आवश्यक राहिल. प्रवासी भारतीयांनी ओळख म्हणून केवळ पासपोर्टची मूळ प्रत सादर करणे आवश्यक असेल, असेही कळविण्यात आले आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!