डोंबिवली :- ( शंकर जाधव ) २०१७- १८ आणि २०१९ या वर्षात सुमारे १२ हजार शेतकऱ्यांनि आत्महत्या केल्या. त्यामुळे मोदी सरकार अन्नदात्याकडे लक्ष देण्यास कमी पडले आहे.आमच्या सरकारमध्येहि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. मात्र आमचे सरकार त्यावर तातडीने उपाययोजना केल्या होत्या. मोडी सरकारमध्ये ज्या शेतकऱ्यांनिआत्महत्या केल्या होत्या, त्याच्या कुटुंबीयांचे काय झाले असेल ? या सरकारमध्ये बेरोजगारी वाढली आहे.या सरकारमुळे नोकऱ्यांमध्ये कपात झाली अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी डोंबिवलीत केली.
डोंबिवली पूर्वेकडील प्रीमियर ग्राउंड येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केद्रीय कृषी मंत्री शरद पवार बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अरुण गुजराती, नेते जयंत पाटील, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड,संजीव नाईक, महेश तपासे, जगन्नाथ शिंदे, संजीव नाईक, डॉ. वंडार पाटील,सुधीर पाटील, महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील, गुलाबराव जगताप, संतोष केणे,चंद्रकांत पाटील, राजेश शिंदे, सारिका गायकवाड,शारदा पाटील, अर्जुनबुवा चौधरी, गंगाराम शेलार,विनया पाटील आदीसह अनेक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला संतोष केणे, अरुण गुजराती,जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी भाषणे केली.यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या भाषणात संसदेत भूमिपुत्र खासदार म्हणून गेला पाहिजे असे सांगितले. ते पुढे म्हणाले, आजची निवडणूक महत्वाची आहे. जनतेने ज्यांना ५ वर्ष सत्ता दिली ते फक्त आश्वसन देत आहेत. देशाच्या १२० कोटी जनतेला अन्न देण्याची जबाबदारी या सरकारची होती. मात्र मोडी सरकार हे करू शकले नाहीत. सरकार कुणाचेही असले तरी महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. मात्र या सरकारमध्ये तसे होताना दिसत नाही.मोडी सरकार लोकांच्या कल्याणासाठी सत्ता वापरत नाहीत.बडाया मारणे हे या सरकार काम आहे. पाणी, पर्यावरण आणि विकासावर जनता या सरकारला प्रश्न विचारीत आहे. मात्र हे सरकार जनतेला उत्तर देत नाही.यावेळी महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील म्हणाले, भूमिपुत्राला उमेदवारी दिल्याबद्दल शरद पवार यांचे आभार मानले.नोटाबंदीमुळे हाल झाल्याचे जनता कधीही विसणार नाही.१४० गावांचा मला पाठिंबा आहे.
राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत `लाव रे तो व्हिडीओ`…
लोकसभेच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील अनेक शहरात भाजपची पोलखोल करणारे व्हिडीओ जाहीर सभेत लावत असल्याने प्रचंड गाजत आहे. डोंबिवलीत शुक्रवारी जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे नेते नितीन गडकरी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पूर्वी युती होण्याच्या आधी एकमेकांवर कश्या शब्दात टीका केली याचा व्हिडीओ आणि नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत भाजपची जनतेला आश्वासन देताना सत्ता येईल ये माहित नव्हते असे हसत बोलताचा व्हिडीओ दाखवण्यात आला. तसेच नितीन गडकरी यांनी `डोंबिवली शहराल सर्वात घाणेरडे शहर` बोलल्याचा उल्लेख केला.