डोंबिवली : लोकसभेची निवडणूक होणार असून यापूर्वी अनेकांनी ईव्हिएम मशीन बाबत संशय व्यक्त केला होता. मात्र कल्याण लोकसभा मतदार संघाच्या होणाऱ्या निवडणुकीत २९ तारखेला मतदान होणार आहे. यावेळी ईव्हिएम मशीन परफेक्ट असल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाणे यांनी डोंबिवलीतील निवडणूक कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केला.तसेच मतदान केंद्रावर यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती,दुसरी रांग पुरुषांसाठी आणि तिसरी रांग स्त्रियांची अश्या तीन रांगा अशी सोय करण्यात आली आहे.या मतदारसंघात २०६३ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रात डोलीची व्यवस्था करण्यात आली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघात एकूण १९६५६३७ मतदार आहेत. यापैकी १८ ते १९ वयोगटात १२३३६, २० ते २९ वयोगटात २६६१६७ , ३० ते ३० वयोगटात ४५८६६५ , ४० ते ४९ वयोगटात ४९४५८२, ५० ते ५९ वयोगटात ३५८७४१, ६० ते ६९ वयोगटात २०४३२६, ७० ते ७९ वयोगटात ८९००३, ८० ते ८९ वयोगटात ४३७८८ मतदार आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २०६३ असे एकूण मतदार केंद्र आहेत. या मतदार केंद्रापैकी ६ सखी मतदान केंद्र आहे. मतदारांसाठी केंद्रावर योग्य दिशा दर्शक, अन्य माहितीचे बोर्ड्स लावण्यात आले आहेत.लहान मुलांसाठी ताप्तपुरते पाळणाघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.एकूण मतदान केंद्रावर ११३७० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.कल्याण लोकसभा मतदार संघात आचारसंहिते संदर्भात आतापर्यत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग, प्लॅग कमानि काढण्याची संख्या ८४४५ अशी असून चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत ११३७० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीत कंट्रोल यंत्र २३९०, बॅलेट यंत्र ४८७२ आणि व्हीव्हीपॅड २५९४ यंत्र आहेत. जर यंत्र खराब झाली तर २० मिनिटात दुसरे यंत्र पोहोचवले जातील. ईव्हिएम बाबत कोणीतीही तक्रार नसावी यासाठी सर्व पक्षीय कार्यशाळा घेऊन यंत्र तपासली गेली आहेत.चाचणी मतदान घेण्यात आले असून सगळ्याची खात्री करून घेण्यात आली आहे.५ टक्के यंत्रावर १ हजार मत टाकून कोणत्याही प्रकारे मतदान केल्यावर संबंधित उमेदवारालाच मतदान होत असल्याची खात्री सगळ्यांना करून देण्यात आली. सर्व यंत्रणा तयार झाली असून निवडणुकीला जास्तीत जास्त मतदार यावेत अशी जनजागृती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाणे यांनी यावेळी दिली. या संघात मतदान मतदारांची ओळखपत्र कमी असलेली आणि कुटुंबीयाशिवाय एकटे राहणारे, मतदान जास्त असलेली अशी १९५ मतदान केंद्र म्हणून ठरवलेली आली आहेत. त्या ठिकाणी मतदानाबाबत कोणत्याही गैरसोय होऊ नये म्हणून वेबकांन्तिंग कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मतदान दिवशी मतदान यंत्र बंद पडले तर ते बदलण्यासाठी झोनल ऑफिसर मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे.अश्या प्रकारे २४६ झोनल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत.त्यांच्यामार्फत मतदान केंद्रावर बंद पडलेले मतदान यंत्र १५-२० मिनिटात बदलणेसाठी नियोजन करण्यात आले आहे. मलंगगड येथील मतदान केंद्रासाठी जादा राखीव मतदान केंद्र ठेवण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थाबाबत कार्यवाही माहिती देण्यात आली आहे. ४४ बेकायदेशीर शस्त्र जमा,११२८ जणांवर प्रतिबंधक कारवाई, २५० प्रकरणात ७३३८ लिटर दारू आणि १३ प्रकरणात १ कोटी ६३ लाख रुपये जप्त अशी कारवाई करण्यात आली.