डोंबिवली : मुबई ठाणे रेल्वे सेवा १८६५ साली सुरू झाली व ११ महिन्यांनी १ मे १६५ ला रेल्वे मार्ग वाढवून कल्याणपर्यंत नेण्यात आला .याला उद्या १ मे रोजी १८६५ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात डोंबिवलीला स्टेशन नसले तरी गाड्या थाबत असत व या नंतर ३३ वर्षानी डोंबिवली रेल्वे स्थानकावर फलाट बांधण्यात आले.
डोंबिवली रेल्वे स्थानकाला १६५ वर्ष पूर्ण होत असताना रेल्वे प्रशासन मात्र याबद्दल अनभिज्ञ आहे कारण रेल्वे प्रशासनाकडे कोणताही रेकोर्ड नाही यामुळे नक्की स्टेशन कधी सुरू झाले हेच कुणाला माहीत नाही. डोंबिवली सर्वाधिक गर्दीचे ,उत्पन्नाचे स्थानक असले तरी रेल्वेला होणारी गर्दी भयानक आहे जो पर्यंत ५ व ६ क्रमांकाचे ट्रेक सुरू होत नाहीत तो पर्यंत लोकल फेऱ्या वाढणं कठीण आहे दिवा स्थानकापर्यंत ५ व ६ व्या ट्रेकचे काम झाले पण मुब्रा व कळवा येथील कामे रखडली आहेत त्यामुळे तातडीने ही कामे पूर्ण केली तर डोंबिवलीकराचा त्रास बराच कमी होणार आहे शिवाय सध्या दोन सरकते जिने असले तरी प्रत्येक फलाटावर सरकत्या जिन्याची गरज आहे डोंबिवली कर नागरिक त्रास सहन करत असले तरी रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे