डोंबिवली :- दि. ३० ( प्रतिनिधी ) दिवा –वसई रेल्वे लाईन जवळीलं एका झुडपात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.रामनगर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. या हत्येप्रकरणी रामनगर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.या हत्येप्रकरणी मारेकऱ्याला अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. मृतदेहाच्या हातावर `लुचन` असे शब्द गोंदविलेलें होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौदागर सुदर्शन तांडी ( २५ ) ओरिसा येथील केगाव मधील बोरफामगाव येथील राहणारा आहे. लुचन लिंगा सुना असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. मारेकरी आणि हत्या झालेला लुचन हे एकमेकांना ओळखत होते. दोघेही ओरिसा राज्यातील राहणारे होते.डोंबिवली पूर्वेकडील एका नवीन बिल्डीगच्या बांधकाम ठिकाणी बिगारी म्हणून काम करत होते.हे दोघेही याच ठिकाणी राहत होते.लुचन याने सौदागर याचे दोन वेळेला पैसे चोरले होते.याचा राग मनात धरून दारू पिऊन या ठिकाणी झोपला असताना सौदागर याने लुचन याचे तोंड दाबून गळा चिरून हत्या केली.पुरावा नष्ट करण्यासाठी सौदागरने लुचनचा मृतदेह मानपाडा येथील नांदिवली येथील दिवा-पनवेल रेल्वे लाईनजवळील झुडपात टाकले होते.या गुन्हाची सौदागर याने पोलिसांकडे कबुली दिली आहे.