भांडूप (शांत्ताराम गुडेकर ) : रहदारीला अडथळा होऊ नये तसेच पादचा-यांना चालणे सोयीस्कर व्हावे यासाठी एमएमआरडीएने नागरिकांसाठी स्कायवाँकची उभारणी केली.मात्र सद्यस्थिती मध्य रेल्वेच्या भांडूप रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील स्टेशन ते एल.बी.एस कडे जाणाऱ्या स्कायवाँक हा पादचा-यांना चालण्यासाठी त्रासदायक ठरत आहे.एल.बी.एस मार्गाकडून वर जाणारा जिन्याजवळच ठिकठिकाणच्या लाद्या तुटलेल्या असून ब-याच ठिकाणच्या लाद्या गायब आहेत.शिवाय हा स्कायवाँक प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे.तर अनेक ठीकाणच्या लाद्या तुटलेल्या असल्यामुळे चालताना प्रवाशांची विशेषतःअपंग,जेष्ठ नागरिक,गरोदर महिला यांची मोठी गैरसोय होते.शिवाय पश्चिम बाजुला जाणाऱ्या या स्कायवाँकला अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत.स्कायवाँक खाली बस थांबा,लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा शिवाय बस/रिक्षा यांची ये-जा असल्याने एखादी लादी खाली पडल्यास बस स्टाँप वर उभे असलेले प्रवाशी,नागरिक व वाहनाचे नुकसान,फेरीवाला जखमी होण्याची शक्यता नाकारण्यासारखी नाही.तसे झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
या स्कायवाँककडे एमएमआरडीए,पालिका प्रशासनाकडून होत असलेला कानाडोळा पाहता सदरचा स्कायवाँक हा प्रेमीयुगुलांना आदण म्हणून देऊन टाकला आहे का?असा प्रश्न सर्वसामान्यनांना पडला आहे.शिवाय या स्कायवाँकवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.पोलीसही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याने भिकारी ,गर्दुल्ले व प्रेमीयुगुलांना फावले आहे. याबाबत भांडूप येथून ये-जा करणा-या रेल्वे प्रवाशांकडून व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.लवकरात लवकर तुटलेल्या लाद्या बसून होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
“एमएमआरडीए ने प्रवाशांच्या सोयीसाठी स्कायवाँक जरी बांधले असले तरी स्कायवाँकवर सुरक्षारक्षक कायमस्वरुपी दिसत नाहीत.स्वच्छतेचे तिनतेरा तर आहेतच.शिवाय तुटलेल्या लाद्या यामुळे चालणे कठीण होते.
सौ.मणस्वी मणवे
प्रवाशी
भांडूप