ठाणे : मुख्य शासकीय समारंभ साकेत मैदानावर 59 वा वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभ बुधवार दि.1 मे रोजी सकाळी आठ वा. पोलीस क्रीडासंकुल,साकेत मैदान,ठाणे येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभ साकेत मैदानावर होणार आहे.या समारंभास सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये,स्थानिक संस्था आणि शासन अंगिकृत संस्था येथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच स्वातंत्र्य सैनिक,मान्यवर व नागरीक यांनी उपस्थित रहावे.या सोहळयात अधिकाधिक व्यक्तींना सहभागी होता यावे यासाठी बुधवार दि.01 मे रोजी सकाळी सव्वा सात ते नऊ वा.या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ करु नये. जर एखाद्या कार्यालयास ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी सव्वा सात पुर्वी किंवा नऊ च्या नंतर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी राजेश नार्वेकर (भा.प्र.से) यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन
April 30, 2019
37 Views
1 Min Read

-
Share This!