डोंबिवली : लोकसभा निवडणुकीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला असून कल्याण पूर्वेत आपल्या २ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन आईने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. कल्याण पूर्वेतील नूतन ज्ञान मंदिर शाळेच्या मतदान केंद्रावर सोनल सावंत यांनी आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन येत मतदान केले. मतदानाचा हक्क बजावताना आपल्या बाळावर देखील लोकशाहीचे संस्कार व्हावे यासाठी आपण बाळासोबत मतदान केले असल्याची प्रतिक्रिया सोनल सावंत यांनी दिली
२ महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन आईचे मतदान
April 30, 2019
19 Views
1 Min Read

-
Share This!