महाराष्ट्र

गडचिरोली येथील नक्षली हल्ल्याचा राज्यपालांकडून तीव्र निषेध; शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबईदि. १ : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यामध्ये वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे, तसेच नक्षलवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आज झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्यात राज्याने आपले शूरवीर पोलीस जवान गमावले असल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या भ्याड नक्षली हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करतो. या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या सर्व पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

गडचिरोली नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे चहापान रद्द

गडचिरोली येथे पोलिसांवर झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र दिनाच्या संध्येला राजभवन येथील चहापान व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपालांनी मान्यवर निमंत्रितांसाठी तसेच विविध देशांच्या राजदूतांसाठी चहापान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!