डोंबिवली : लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांंना काम देण्यात आले होते.पालिकेतील एक सफाई कर्मचारी मतदानाच्या एम दिवस आगोदर मतदान केंद्रावर सकाळी गेल्यावर तेथेच चक्कर येऊन पडला.तब्बल दोन तास मतदान केंद्राच्या एका बाजूस त्यांना झोपल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी पहिले. तात्काळ त्यांना मुंबईतील केइएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.मतदान केंद्रावरील नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांंनी चक्कर आलेल्या कर्मचाऱ्याची माहिती वेळेवर दिली नसल्याचे घनकचरा व्यवस्थापक विभागाचे अधिकारी विलास जोशी यांनी सांगितले.
अशोक धोंडू पांडे हे सफाई कर्मचारी हे रविवारी दुपारी निळजे गावातील मतदान केंद्रात इलेक्शन ड्युटीसाठी गेले होते. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर पांडे यांना चक्कर आली. त्यावेळी मतदान केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांंनी पांडे यांना केंद्राच्या एका बाजूस बसवले. याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मुंबईतील केइएम रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.याबाबत पालिकेच्या डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापक विभागाचे अधिकारी विलास जोशी यांना बाबत विचारले असता सफाई कर्मचाऱ्याला चक्कर आल्याचे पाहून याची माहिती तात्काळ देणे आवश्यक होते.
इलेक्शन ड्युटीवरील पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यावर केइएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु …
