डोंबिवली : ( प्रतिनिधी ) प्रदुषणाबाबत देशात २ रा आणि राज्यात ७ व्या क्रमाकांवर असलेल्या डोंबिवली शहर आहे. वाढत्या प्रदुषणामुळे डोंबिवलीतील लहान मुलांमध्ये श्वसनाचे विकार होत आहेत. सर्दी,पडसे,दमा आणि अस्थमा असे आजार होत आहेत. याउलट स्वच्छ शहरात लहान मुलांना असे आजार होत नाहीत अशी माहिती बालरोगतज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी वार्तालाप मध्ये दिली.
डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलिनी येथील एस हॉस्पिटल येथे वार्तापालाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यात लहान मुलांसाठी असलेले सर्वात मोठे हॉस्पिटल म्हणून एस हॉस्पिटल प्रसिद्ध आहे.डोंबिवली आणि कल्याण मधील सात बालरोगतज्ञांनी एकत्र येऊन बारा वर्षापूर्वी या रुग्णालयाची स्थापना केली होती. आज या रुग्णालयात विविध अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध आहेत.या रुग्णालयाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या वार्तापाल मध्ये डॉ. डॉ. उल्हास कोल्हटकर, डॉ. श्रीपाद कुलकर्णी आणि डॉ. गोविंद कुलकर्णी उपस्थित होते.नवजात बालकांकरता तसेच थोड्या मोठ्या मुलांसाठी अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या विविध समस्यांसाठी त्या त्या क्षेत्रातील सुमारे २१ तज्ञ लहान मुलांचे हृद्यविकार तज्ञ, नेत्रविकार तज्ञ,डेटीस्ट, रक्तविकार तज्ञ, प्लास्टिक सर्जरी, युरोसर्जन,मूत्रविकार तज्ञ,एन्डोक्रायनॉलाॅॅॅजिस्ट इ.सुसज्ज सभागृह, कॅॅटीन,रुग्णावाहिका, या अनेक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत.दिवसेदिवस वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चाला तोंड देण्यासाठी विविध सेवाभावी संस्थाचीही मदत उपलब्ध आहे. त्याची माहिती व्हावी म्हणून व याद्वारे त्यांना मदत मिळावी याउद्देशाने मेडीओसोशल वर्कर्स विभागाचीही सोय केली आहे.बालरोगतज्ञ डॉ.उल्हास कोल्हटकर म्हणाले, डोंबिवलीतील प्रदूषणाचा लहान मुलाच्या आरोग्यावर परिमाण होत आहे.धुळीचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे लहान मुलांना श्वसनाचे विकार होत आहे. लहानमुलांना पाणी उकळून पाजावे. एस रुग्णालयात लहान मुलांना प्रसन्न वाटावे म्हणून कलरफुल रुग्णालय करण्यात आले आहे.यावेळी उपस्थित डॉक्टरांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू यानी तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी अंकिता केळकर यांनी सांभाळली.