टीटवाळा : सार्वजनिक जागेवर बियर पिण्यास विरोध केल्याने संतापलेल्या त्रिकुटाने एका तरुणावर हॉकी स्टिक तलवारीने हल्ला केल्याची घटना टीटवाळा नजीक गाळेगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली .या प्रकरणी टिटवाळा पोलीस स्थानकात रोहित जाधव ,आदेश जाधव ,व भावशा या त्रिकुटा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे
टीटवाळा नजीक गाळेगाव परिसरात राहनारा रोहित सावंत हा मंगळवारी याच परिसरातील एका गॅॅरेज समोरून जात होता. त्याला गॅॅरेज नजीक असलेल्या झाडाजवळ रोहित जाधव ,आदेश जाधव ,व भावशा हे तिघे बियर पीत असल्याचे निदर्शनास आले .रोहितने या तिघांना या ठिकाणी बियर पिवू नका असे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या या त्रिकुटाने रोहितला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर या तिघांनी हॉकी स्टिक ,तलवारीने रोहितवर हल्ला केला. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .या प्रकरणी टिटवाळा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी रोहित जाधव ,आदेश जाधव ,व भावशा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोधस सुरु केला आहे .याबाबत टीटवाळा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेश खोपकर यांनी रोहित जाधव ,आदेश जाधव ,व भावशा या तिघा विरोधात गुन्हा दाखल केल असून ते फरार असून त्याचा शोध सुरु असल्याचे सांगितले.
|