महाराष्ट्र

माथेरानच्या बेलवेडीयर पॉईंट वरुन पडुन दिव्यातील महीला पर्यटकाचा मृत्यु

माथेरान :  माथेरान पर्यटन स्थळावर अभिषेक मिश्रा राहणार दिवा (मुंबई)आपली पत्नी गिता मिश्रा, दोन मुली चाहत,अन्यना तसेच मित्र सचिन शुक्ला यांच्यासह पर्यटनाला आले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास माथेरान येथील बेलवेडीयर पॉईट पाहण्यासाठी गेले असता पत्नी गिता मिश्रा हीचा पाय घसरुन ८०० फुट खोल दरीत पडुन मृत पावल्याची घटना घडली आहे.

माथेरान मधील सात पॉईट सर्कल मधील महत्वाचा  पॉईट असलेला बेलवेडीयर पॉईट सुरक्षेच्या दृष्टीने रेलिंग नसल्याने अतिशय धोकादायक आहे या ठिकाणी दि. ४ रोजी मिश्रा कुटुंब फीरण्यासाठी आले असताना अशी घटना अचानक घडल्याने अभिषेक  मिश्रा यांनी भेदरलेल्या अवस्थेत स्थानिकांच्या मदतीने माथेरान पोलिसांना कळविले यानंतर माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड,पोलीस नाईक रुपेश नागे तसेच सह्याद्री मित्र रेस्क्यु टिम यांनी घटना स्थळी धाव घेऊन खोल दरीत उतरुन गिता मिश्रा यांचा शोध सुरु केला असता ८०० फुट खोल दरीत तिचा मृत्युदेह आढळला यावेळी सह्याद्री मित्र रेस्क्यु टिमचे सुनिल कोळी,उमेश मोरे, वैभव नाईक,सुनिल ढोले,अक्षय परब,अजिंक्य सुतार,अमोल सकपाळ तसेच ऋषिकेश कोळी यांनी अथक परीश्रमानंतर खोल दरीतुन मृतदेह वर काढुन बी जे हॉस्पिटल माथेरान येथे शवविच्छेदना करीता पाठविण्यात आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!