भारत

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे अंगरक्षक आनंद देशमुख यांच्या कुटुंबातील सहा जणांसह चालक ठार

बंगळुरु : बंगळुरु येथे झालेल्या भीषण अपघातात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे अंगरक्षक आनंद देशमुख यांच्या कुटुंबातील ६ जण आणि एक चालक अशा ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. त्यांच्या कारची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली. यात कारचा चक्काचूर झाला असून अक्षरश: कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागल्याचे समजते.

मिलिंद नारायण देशमुख (वय ४५), त्यांची पत्नी किरण मिलिंद देशमुख (वय ३५), मुलगा आदीत्य (वय १२) व अजिंक्य (वय ०७) यांच्यासह राजेश नारायण देशमुख (वय ३७), पत्नी सारिका राजेश देशमुख (वय ३१) अशा सहा जणांसह चालक जागीच ठार झाला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!