गुन्हे वृत्त

एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी करणाऱ्यांना बेड्या

लोणावळा : हजारो भाविकांची श्रध्दा असलेल्या कार्ल्याच्या एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेला कळस जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिली.

राहूल भागवत गावंडे, सोमनाथ अशोक गावंडे (रा. धामणगाव आवारी, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

दोन वर्षांपुर्वी चोरला होता कळस
राज्यातील आगरी व कोळी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरातून अडीच किलो वजनाचा पंचधातुचा कळस ३ ऑक्टोबर २०१७ रोजी चोरीला गेला होता. याप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून याचा शोध घेतला जात होता. त्यासोबतच यामुळे मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये आणि राजकीय स्तरावरून वातावरण तापले होते. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!