पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर चहासाठी थांबलेल्या लग्झरी बसमधील व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे तसेच हिऱ्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वेशांतर करुन मध्यप्रदेश येथून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. अटक आरोपींकडून सोन्याची बिस्किटे आणि कार असा ३६ लाखाचा ऐवज जप्त केला आहे.
दिपक पुरुषोत्तमलाल सैनी (२४, रा. हैदर वस्ती, जुनी पोलीस लाईनजवळ, सिकंदराबाद, तलंगणा ) याने फिर्याद दिली होती.
भवानी एअर लॉलेस्टीक प्रा.लि. या कुरीयर कंपनीचे सोने, हि-याचे दागिने व रोख रकमेचे पार्सल हैद्राबाद येथून मुंबई येथे खाजगी प्रवासी लग्झरी बसने घेवून जात होते. बस सकाळी चहा व नास्ता करणेकरीता हॉटेल न्यु सागर, पुनावळे, वाकड येथे थांबली होती. त्यावेळी सैनी हा खाली उतरला असताना त्याने त्याची सोन्याचे दागीने, सोन्याची बिस्कीटे, हिरे व रोख रक्कम असलेली पिशवी सॅक बॅग अज्ञात इसमांनी चोरली. हिंजवडी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला.