डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रात विशेषतः ग्रामीण भागात मेाठया प्रमाणात टॅॅकरमार्फत मोफत पाणी पुरवठा करण्यात येत होता. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने तसेच पाणी पुरवठयाचा अपव्यय होत असल्याने आयुक्त गोविंद बोडके यांनी मोफत पाणी पुरवठा बंद केला आहे. ज्यांना पाणी हवे असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरुन ४०० रुपये भरतील त्यांनाच टॅॅकरने पाणी पुरवठा करण्याचे फर्मान सोडले आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढावे,टॅॅकरव्दारे होणाऱ्या पाण्याचा गैरवापर होऊ नये यासाठी नागरिकांना अधिकृत नळजोडणी घेण्यासाठी परावृत्त करणे यासाठी आता मोफत टॅॅकरने पाणी पुरवठा करणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका क्षेत्रात अनधिकृत इमारतींना होणाऱ्या अनधिकृत पाणी पुरवठयास आळा घालण्यासाठी तसेच कर न लागलेल्या व पाण्याची जोडणी नसलेल्या इमारतींना होणारा अनधिकृत पाणी पुरवठयास आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये तसेच पश्चिमेला काही भागात पाणी पुरवठा मोफत केला जातो. मात्र या टॅॅकरने होणाऱ्या मोफत पाणी पुरवठयाचा टॅॅकरचालक गैरफायदा घेतात,जोडणी नसलेल्या इमारतीना अनधिकृत पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर आयुक्त गोविंद बोडके यांनी ५ एप्रिल रोजी मोफत पाणी पुरवठा बंद करण्याचे फर्मान सोडले आहे. महापालिकाक्षेत्रात नवीन पाईप लाईन टाकण्याची कामे करण्यात आली असून आता बर्याच भागात पाणी पुरवठा सुरळीत होत आहे पालिकेचे उत्पन्न वाढावे,व पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जलअभियंता राजीव पाठक यांनी सांगितले.