मुंबई : महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्रलेखक व कवी महासंघ या संस्थान मार्फत, हुतात्मा बाबु गेनु स्मारक, परळ, मुंबई येथे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मानवी अधीकार, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेवून मान्यवरांचा “मराठी राजभाषा गौरव पुरस्कार २०१९” देऊन गुणगौरव करण्यात आला.
सदरचे पुरस्कार माननीय आमदार अजयभाऊ चौधरी, प्रकाश जाधव (अध्यक्ष, मुक्त पत्रकार), डाॅ. सागर नटराज (प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक), वर्षा विद्या विलास (जेष्ठ समाजसेविका), मकरंद वांगणेकर (ज्येष्ठ कवी), सुरज भोईर (पुरस्कार वितरण समिती, संयोजक) यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते रेश्मा निकाळजे, सुभाष गायकवाड, डॉ. मनोहर कांबळे, पूनम शिंदे, मंजू सराठे, विलास देवळेकर, राजेश साबळे, कमलाकर राऊत, गुरुदत्त वाकदेकर यांना प्रदान करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुरज भोईर, डाॅ. संतोष शिवाजी कांबळे यांनी प्रचंड मेहनत घेतली.