डोंबिवली : सामाजिक , शैक्षणिक, क्रीडा , आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेली १२ वर्ष कार्यरत असलेल्या आविष्कार फौंडेशन या संस्थेच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रीय व राज्य पातळीवर कृतज्ञता गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व करत असलेल्या निवडक मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.सामाजिक क्षेत्रात काम करत असलेले डोंबिवलीतील समाजसेवक सुभाष महाजन यांच्या कार्याची दाखल घेत संस्थेने राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.रविवारी १२ मी रोजी सकाळी ११ वाजता सातारा येथील शिवाजी स्टेडीयम जवळील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक येथे सदर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
सुभाष महाजन यांना समाजरत्न गौरव पुरस्कार जाहीर
May 7, 2019
36 Views
1 Min Read

-
Share This!