मुंबई : हद्दीत अवैध धंदे होऊ देऊ नका अशी तंबी देण्यात आलेली असतानाही वरिष्ठांच्या आदेशानुसार बारवर दुसऱ्यांदा छापा टाकला. त्यामुळे गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान अवैध धंद्यांना खतपाणी घातल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याची चर्चा आहे.
२८ सप्टेबर २०१८ रोजी पोलिस उपायुक्तांनी ग्रॅन्ट रोड रेल्वे स्टेशनजवळील गोल्डन गुज बार वर कारवाई केली होती. त्यावेळी हद्दीत अवैधधंदे होऊ देऊ नका अशी तंबी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील यांना वरिष्ठांनी दिली होती. त्यानंतर आयुक्तांच्या सुचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस उपायुक्तांनी २७ एप्रिल रोजी ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील गोल्डन गुज बारवर पुन्हा छापा टाकला होता.
या छाप्यात कॅशियर, मॅनेजर, वेटर आणि ग्राहकांसह ५१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यासोबतच ८ बारबालांनाही ताब्यात घेण्यात आले होते. काही धनदांडग्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंह पाटील हेदेखील हद्दीतच हजर होते.