भिवंडी : भोईवाडा पोलिस स्टेशन भिवंडी गु.र.न 171/2019 भादवि क.363,364,364(A) प्रमाणे गुन्ह्यातील दिले फिर्यादीवरून फिर्यादी यांची मुलगी वय 3 वर्ष हीस आरोपी नामे कलाम याने हातगाडीवर अंडा खाण्याचे बहाण्याने दिनांक 08 मे 2019 रोजी 21:00 वाजताच्या सुमारास अपहरण करून आरोपीने फिर्यादी यांना फोनद्वारे मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची हकीगत सांगितल्याने सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही सदर बाबतची माहिती मा.पो.उपायुक्त परि 2 भिवंडी यांना देण्यात आली.
मा.dcp zone 2 सर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ 5 टीम तयार करण्यात येऊन त्यांना कल्याण रेल्वे स्टेशन, डोंबिवली रेल्वे स्टेशन, देवुनगर भिवंडी येथे पाठवण्यात आले. आरोपीचे प्राप्त मोबाईल चे tower लोकेशन प्राप्त करुन आरोपी व बालिकेचा वाळवली बदलापूर पूर्व येथे परिसरात कसून शोध घेऊन आरोपी व पीडित मुलीस ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे अब्दुल कलाम अजित चौधरी वय 45 वर्ष धंदा मजुरी राहणार निलेश शेठ त्याची खोली हनुमान मंदिराच्या मागे वाळवी गाव बदलापूर पूर्व यास अटक करण्यात आलेली आहे तसेच अपनयन करण्यात आलेल्या बालिकेस तिचे वैद्यकिय तपासणी करून आई-वडिलांचे ताब्यात सुखरूप रित्या देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा.पो.उपायुक्त परि-2 यांचे मार्गदर्शनाखाली मा.स.पो.आ.भिवंडी, व.पो.नि श्री कर्पे, पो.उपनिरी. सचिन बाराते, निलेश जाधव, स.पो. नि.सरोदे, पो.उपनिरी बरकते, वाघ यांनी उतकृष्टरित्या करून 05 तासात अपहृत मुलगी व आरोपी चा शोध घेतला आहे.