गुन्हे वृत्त

  प्रियकरासोबतचे फोटो पाहून पतीने केला पत्नीवर चाकू हल्ला

कल्याण  : पत्नीचे तिच्या लग्नाआगोदरच्या प्रियकरासोबतचे फोटो पाहून संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करून सपासप वार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी कल्याणच्या जोशीबाग परिसरात घडला.

काजल शिगवण असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर विकास शिगवण याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल आणि विकास हे दोघे मोहने येथे राहतात. काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरू असल्याने काजल जोशीबागेत असलेल्या तिच्या माहेरी राहायला आली होती. त्यातच काजलचे विवाहबाह्य संबंधाबाबत विकासला समजले.

त्यातच विकासने काजल आणि तिच्या प्रियकराचा फोटो पाहिला. त्यामुळे त्याला राग अनावर झाला. बुधवारी काजल आणि साडेतीन वर्षांची मुलगी घरात असताना विकास घराच्या मागच्या दाराने घरात घुसला. त्याने बेसावध असलेल्या काजलवर चाकूने सपासप वार करत हल्ला चढवला

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!